Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना आज दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातून (Sir Ganga Ram Hospital) डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. त्यांना 30 जुलै रोजी नियमित चाचणी आणि तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्जच्या वेळी तिची प्रकृती स्थिर होती. यासंदर्भात सर गंगा राम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली आहे.

दरम्यान, 30 जुलै रोजी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या बैठकीत कोरोना, भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली होती. (हेही वाचा - उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन; योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द)

या बैठकीनंतर काही वेळातचं सोनिया गांधी यांनारुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉ. डी. एस. राणा यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारीलादेखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.