उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन; योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द
UP Cabinet Minister Kamla Rani Varun Passes Away (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण (Kamala Rani Varun) यांचे लखनऊ (Lucknow) मध्ये निधन झाले आहे. राणी वरुण लखनऊ मधील रूग्णालयात कोरोनावर (Coronavirus)  उपचार घेत होत्या. मात्र 62 व्या वर्षी आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 3 मे 1958 रोजी कमल राणी वरुण उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. त्या अकराव्या आणि बाराव्या लोकसभेच्या सदस्याही होत्या. सध्याच्या योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांंच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंंत्री होत्या. आज त्यांच्या मृत्यु नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या (Ayodhya )दौरा रद्द झाला आहे. राम जन्मभुमी मंदिर भुमी पुजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज योगी आदित्यनाथ अयोध्येला जाणार होते.

कमला राणी वरुण यांंच्या कारकीर्दी बाबत सांंगायचे झाल्यास,1989 ते 1995 या काळात त्या महानगर परिषदेवर होत्या.1996 मध्ये त्या 11व्या लोकसभेच्या सदस्य म्हणुन त्या निवडुन आल्या. 1996 ते 1997 पर्यंत त्यांनी कामगार व कल्याण समिती आणि उद्योग समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले. 1997 मध्ये महिला सबलीकरणावर समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले.1998 मध्ये त्या दुसर्‍यांदा संंसदेत निवडुन आल्या, 1998 ते 1999 दरम्यान त्यांनी अधिकृत भाषा समिती, कामगार व कल्याण समिती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीसमवेत विविध समित्यांच्या सदस्य म्हणून काम केले.

ANI ट्विट

कमला राणी वरुण या कानपूर विद्यापीठात समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर होत्या, त्यांनी 25 मे 1975 रोजी किशनलाल वरुणशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. मागील काही दिवसांपासुन त्या कोरोनाशी लढत होत्या आज अखेरीस त्यांची ही झुंंज अयशस्वी ठरली आहे.