अनेक दिवसांपासून नाराज असलेले गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर कैाॅंग्रेस पक्षाकडून आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल (Shaktisingh Gohil) म्हणाले, हा आरोप काँग्रेस सोडणाऱ्यांचा नाही. हे सर्व भाजपने लिहिले आहे.” त्यांनी प्रश्नार्थक स्वरात विचारले की, भाजपने हे ठरवले नसते तर प्रत्येकाचे शब्द सारखे नसते. गोहिल पुढे म्हणाले, "जर तुम्ही पक्ष नेतृत्वाबद्दल बोलाल तर, तुम्ही काही दिवसांपूर्वी राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) स्टेज शेअर करत होता. त्यांना भेटण्यापासून तुम्हाला कोणी रोखले? आपल्याकडे अंतर्गत लोकशाही आहे. अंतर्गत लोकशाही आणि अनुशासनहीनता यात एक पातळ रेषा आहे. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही नाही.
Tweet
If you talk about (party's) leadership, you were sharing a stage with Rahul Gandhi a few days back. Who stopped you from meeting him? We have internal democracy. There is a thin line between internal democracy & indiscipline. BJP doesn't have internal democracy: Shaktisinh Gohil pic.twitter.com/KqtWTgKsC6
— ANI (@ANI) May 18, 2022
गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खुद्द पाटीदार नेत्याने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: Hardik Patel Resign: हार्दिक पटेलकडून मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले- काँग्रेस नेते फक्त चिकन सँडविचवर लक्ष केंद्रित करतात)
हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत राजीनामा पत्र ट्विट करत हार्दिक पटेल यांनी लिहिले की, 'आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.