आतापर्यंत अकरावी समाजशास्त्राच्या पुस्तकात कुटुंबाचे दोनच प्रकार होते. त्यामधील एक विभक्त दुसरे संयुक्त. परंतु आता दोन प्रकारांसोबत, घटस्फोटित महिला, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशीप याही प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
सध्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले आहेत. लिव्ह इन रिलेशनशीपचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचसोबत घटस्फोटित महिला समर्थपणे त्यांच्या मुलांचे संगोपन करत आहेत. 2018 मध्ये समलैंगिक संबंधांनाही भारतात कायद्याने मान्यता मिळाली आहे. यामुळेच आता अकरावी समाजशास्त्राच्या पुस्तकात अनेक बदल बालभारतीने केले आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गतिमान समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात पडावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून याबद्द माहिती देण्यात आली आहे.(महिला, गे लोकांच्या अधिकारासाठी Nicki Minaj हिने रद्द केला सौदी अरब येथील आयोजित कार्यक्रम, चाहत्यांकडून टीका)
लिव्ह इन रिलेशनशीप युरोपमध्ये प्रचलित असून आता भारतातील शहरी भागात देखील लिव्ह इन रिलेशनशीपचे प्रमाण वाढते आहे असं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. अकरावीच्या पुस्तकात पहिल्यांदाच अनेक आधुनिक संकल्पना समाविष्ट केल्यामुळे बालभारतीचे कौतुकही करण्यात येतं आहे.