Nicki Minaj | (Photo Credits: Instagram)

अमेरिका येथील टॉपची रॅपर आर्टिस्ट निकी मिनाज (Nicki Minaj) हिने सौदी अरब (Saudi Arabia) मधील आपला आयोजित कार्यक्रम रद्द केला आहे. लाईव्ह परफॉर्मन्स स्वरुपातील कार्यक्रम निकी मिनाज हिने महिला आणि गे लोकांच्या हक्कासाठी रद्द केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सौदी अरबमध्ये होणाऱ्या एका कल्चरल फेस्टिवलमध्ये निकी उपस्थिती दर्शवणार होती. परंतू, ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्यामुळे सोशल मीडियावरुन तिच्यावर जोरदार टीका होत आहे. सौदी अरेबिया हा देश महिला आणि गे समूहाप्रती पारंपरीक विचार ठेवतो. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे मिनाजने म्हटले आहे.

न्यूयॉर्क बेस्ड मानवाधिकार फाउंडेशनने मिनाज हिला एक ओपन लेटर शुक्रवारी लिहीले होते. या लेटरमध्ये फाउंडेशन ने म्हटले होते की, या फेस्टिवलमध्ये निकी मिनाज हिने सहभागी होऊ नये. सौदी अरबमध्ये महिला आणि गे लोकांवर असलेल्या बंधनांचा विचार करुन तिने या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा.

 

View this post on Instagram

 

More alcohol added to my grape concord blend- @myxfusions #moscato #sangria #wine 13% /a>

A post shared by Barbie® (@nickiminaj) on

दरम्यान, या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यावर निकी मिनाज हिच्यावर चाहत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे. या टीकेनंतर मिनाज हिने आपली भूमिका व्यक्त केली आहे. यात तिने म्हटले आहे की, 'मी सौदी अरेबियातील आपल्या चाहत्यांना शानदार परफॉर्मन्स देऊ इच्छित होती. मात्र, अनेक मुद्द्यांवर विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला की मी या कार्यक्रमात सहभागी न झालेलेच बरे. मला वाटते की, सौदीतील महिला आणि एलजीबीटीक्यू समूहाच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काला पाठींबा देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.' (हेही वाचा, माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

 

View this post on Instagram

 

#Brrratatatat

A post shared by Barbie® (@nickiminaj) on

निकी मिनाज ही आपल्या हॉट, बोल्ड आणि वादग्रस्त व्हिडिओजसाठी प्रसिद्ध आहे. या फेस्टीवलचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, मनोरंजनावर गेली अनेक दशकं असलेली बंदी सौदी सरकारने हटवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या फेस्टीवलमध्ये उत्सुकता दाखवली होती.