Coca-Cola Closes Bottling Subsidiary BIG: कोका-कोलाने बॉटलिंग उपकंपनी 'बीग' केली बंद, ब्रँड आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला मोठा निर्णय
Coca-Cola Closes Bottling Subsidiary BIG (PC - X/@KhalilJeries)

Coca-Cola Closes Bottling Subsidiary BIG: कोका-कोला (Coca-Cola), भारतातील सर्वात मोठ्या पेय कंपन्यांपैकी एक असलेली एक मोठी कंपनी आहे. कोका- कोला आपला बॉटलिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुप (BIG) बंद करणार आहे. या अंतर्गत ही अमेरिकन कंपनी भारतासह जगभरात आपले बॉटलिंग ऑपरेशन करते. कोका-कोलाचे आंतरराष्ट्रीय विकास अध्यक्ष हेन्रिक ब्राउन यांनी एका अंतर्गत नोटमध्ये सांगितले की, BIG चे कॉर्पोरेट कार्यालय 30 जून रोजी बंद होईल. BIG चे मुख्यालय बंद करण्याची आणि आमच्या उर्वरित बॉटलिंग गुंतवणुकीवर अधिक सुव्यवस्थित पद्धतीने देखरेख करण्याची हीच योग्य वेळ आहे, असंही हेन्रिक ब्राउन यांनी सांगितलं आहे.

भारत, नेपाळ आणि श्रीलंका कोका-कोलाच्या अंतर्गत मंडळाच्या देखरेखीखाली राहतील, असेही या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाचा भारतावर थेट परिणाम होईल, कारण कोका-कोला इंडियाची संपूर्ण मालकीची बॉटलिंग कंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) थेट BIG च्या नियंत्रणाखाली होती. (हेही वाचा -Fake Coca Cola: सावधान! कोको कोला भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

इकोनॉमिक्स टाइम्सने 18 जून रोजी अहवाल दिला होता की, कोका-कोलाने HCCB मधील स्टेक विकण्यासाठी किमान चार मोठ्या भारतीय व्यावसायिक घराण्यांशी आणि कार्यालयांशी संपर्क साधला होता. कंपनीच्या आयपीओपूर्वी मूल्य अनलॉक करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रविवारपासून, कोका-कोलाची बॉटलिंग गुंतवणूक आणि ऑपरेशन्स अंतर्गत मंडळाद्वारे व्यवस्थापित केले जातील. हे मंडळ बॉटलिंग व्यवसायाच्या कामगिरीवर आणि धोरणावर लक्ष ठेवेल. (हेही वाचा - Coca-Cola कंपनी लवकरच भारतात लॉन्च करणार छास,लस्सी आणि कैरी पन्हे)

ब्राऊन हे या बोर्डाचे अध्यक्ष असतील. यामध्ये जागतिक कामकाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. यामध्ये मोनिका हॉवर्ड डग्लस, मुरत ओझगेल, एनरिक रापेटी, तपस्वी चंदेले आणि जॉन मर्फी यांचा समावेश आहे. ब्राउन यांनी नोटमध्ये म्हटले आहे की, या निर्णयाचा उद्देश निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि सर्व बाजारपेठांमध्ये क्षमता मजबूत करणे हा आहे.