जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) हैदरपुरा, (Haiderpura) श्रीनगरमध्ये (Srinagar) आज सुरक्षा दलांना (Security forces) मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा (Terrorists) खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले की, अज्ञात दहशतवादी चकमकीत ठार झाला. अजूनही कारवाई सुरू आहे. याआधी गुरुवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या वर्षात आतापर्यंत 130 हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. 38 परदेशींसह 150-200 दहशतवादी अजूनही खोऱ्यात सक्रिय आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
J&K: Security forces have eliminated an unidentified terrorist in an encounter in Hyderpora area of Srinagar. The encounter is still in progress.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/8DmAB6NAw4
— ANI (@ANI) November 15, 2021
याआधी 8 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका सेल्समनची हत्या केली होती. याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली होती. ऑक्टोबरमध्ये दहशतवाद्यांनी 13 नागरिकांची हत्या केली होती. यामध्ये व्यापारी, मजूर आणि शिक्षकांचा समावेश आहे. ऑक्टोबरमध्येच दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. त्याचवेळी सुरक्षा दलांनी 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला.