छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा जिल्ह्यातील पातररासमध्ये 11 वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीने शौचालयात एका मृत बाळाला जन्म दिला आहे. या सर्व प्रकारानंतर वसतिगृहात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच गुंडरदेहीचे पोलिस रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असुरक्षित प्रसूती झाल्याने बाळाचा जन्मानंतर मृत्यू झाला. तसेच लग्न न करता बाळाला जन्म दिल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर वसतिगृहाच्या अधीक्षिका हेमलता नाग खोटं बोलल्या. हेमलता यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बुधवारी सकाळी पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (हेही वाचा - औरंगाबाद: रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये पाय अडकडून पडल्याने मागून आलेल्या बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू)
Chhattisgarh: A class 11 student of a school in Patarras of Dantewada, gave birth to a child at the school's hostel. Dy Collector (in pic) says, "Child was stillborn. Girl says she's in a relationship with a boy of her village since 2 yrs. Hostel superintendent suspended."(18.01) pic.twitter.com/5oQa7DRE1a
— ANI (@ANI) January 19, 2020
त्याआधी अल्पवयीन मुलीने मृत बाळाला जन्म दिला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. बाळाला जन्म दिलेल्या अल्पवयीन मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच मृत बाळाला मुलीच्या कुटुंबाकडे देण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.