औरंगाबाद: रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये पाय अडकडून पडल्याने मागून आलेल्या बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

औरंगाबाद (Aurangabad) येथे व्यायाम शाळेत जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा पाय चुकून रस्त्यावरील केबलमध्ये अडकला गेला. मात्र त्याचवेळी पाठून आलेल्या बसची जोरात धडक बसल्याने सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रस्त्यात पडलेल्या केबलमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ललिता ढगे असे मृत महिलेचे नाव आहे.

ललिता या पतीला सोडून दुचाकीने व्यायाम शाळेत जात होत्या. त्याचवेळी रस्त्यात पडलेल्या एका केबलच्या वायरमध्ये पाय अडकून ललिता या खाली पडल्या. मात्र खाली पडल्यावर सावरणार तितक्यात पाठून कामगारांनी भरुन आलेल्या बसची जोरात धडक त्यांना लागल्याने त्या जखमी झाल्या. मात्र तातडीने पोलिसांना माहिती देत ललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच ललिता यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांकडून बस चालकाचा शोध घेतला असून त्याने अपघात झाल्यानंतर पळ काढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(अलिबाग कडून मुंबई ला जाणारी बस ट्रकला धडकल्याने 24 जण जखमी; वाचा संपूर्ण माहिती)

गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन चालणाऱ्या एका तरुणाचा विद्युतवाहक तारेवर पाय पडला. त्यामुळे अचानक त्यामधून आग बाहेर येत त्याचे दोन्ही पाय भाजले गेल्याची घटना घडली होती. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांकडून वारंवार संताप व्यक्त करण्यात येतो. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याची बाब सुद्धा समोर आली आहे.