अलिबाग कडून मुंबई ला जाणारी बस ट्रकला धडकल्याने 24 जण जखमी; वाचा संपूर्ण माहिती
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Bus And Truck Accident In Raigad: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ट्रक आणि बसची धडक झाल्याने 17 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण चोवीस जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, एसटी बस सकाळी 8.30 वाजता अलिबागवरून मुंबईच्या दिशेने (Alibaug to Mumbai ST bus) जात होती त्यादरम्यान हा अपघात नागोठणे येथे झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वेगवान ट्रकच्या चालकाच्या चाकांवरील ताबा सुटला. परिणामी, हा ट्रक बसला (Truck hits ST bus in Raigad) धडकला, असे ते म्हणाले.

"महाविद्यालयातील 17 विद्यार्थी आणि ट्रक चालक यांच्यासह चोवीस जण जखमी झाले आहेत. त्या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांना नंतर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले, ”असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओडिशा: मुंबई- भुवनेश्वर लोकमान्य तिलक एक्सप्रेस रूळावरून घसरली; 20 प्रवासी जखमी

सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. PTI ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.