Photo Credit - X

Cherrapunji Rainfall Video: मेघालया(Meghalaya)तील चेरापुंजीमध्ये पावसाचा (Cherrapunji Rainfall) हाहाकार सुरूच आहे. सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात तेथे 634 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 72 तासात एकूण पावसाचा आकडा 1202 मिमीवर पोहोचला(Rainfall Record) आहे. (हेही वाचा:Southwest Monsoon 2024 Update: मान्सून केरळ मध्ये दाखल; IMD ची माहिती )

पावसाची ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. चेरापुंजी येथे देशातील सर्वाधीक पाऊस पडण्याचा प्रदेश आहे. पावसाचे मन हेलावूण टाकणारे दृश्य तेथे व्हिडीओच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. एवढ्या दमदार पावसामुळे चेरापुंजी आणि परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत आणि वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

प्रशासनाने लोकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासनाने आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू केले आहे.