तीव्र उन्हाळ्यानंतर आता भारतामध्ये मान्सून चं आगमन झालं आहे. अंदमान पाठोपाठ आज (30 मे ) दिवशी केरळ मध्येही मान्सून आला आहे. हवामान विभागाकडून आज मान्सून आगमनाच्या बातमीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज, 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आता पुढील 8-10 दिवसांत मान्सून कोकण किनारपट्टी वर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 15 दिवसांत महाराष्ट्र राज्य व्यापलं जाईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. 

केरळ मध्ये मान्सून दाखल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)