Justin Trudeau (PC-Wikimedia Commons)

Big Blow To Canada: G20 परिषदेच्या भव्य आयोजनानंतर आता P20 परिषद दिल्लीत सुरू झाली आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर-यशोभूमी येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत G-20 देशांच्या संसदेचे स्पीकर आणि पीठासीन अधिकारी सहभागी होत आहेत. P20 बैठक गुरुवारी सुरू झाली, ज्यामध्ये G20 देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेल्या 'LIFE'  मोहिमेवर संसदीय मंचावर भाग घेत आहेत. मात्र, कॅनडाने यापासून स्वतःला दूर केले आहे. कॅनडा 9व्या G20 संसदीय अध्यक्ष समिट (P20) आणि संसदीय मंचाच्या अजेंडातून गायब आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर या विषयावर चर्चा होऊ नये म्हणून कॅनडाने या परिषदेला अनुपस्थिती दाखवण्याचा निर्णय घेत आहे.