Vaishno Devi Pilgrims Bus Fire: वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग; चार जणांचा मृत्यू, 22 जखमी
Vaishno Devi Pilgrims Bus Fire (PC - ANI)

Vaishno Devi Pilgrims Bus Fire: वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. कटराहून जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसचा नोमाईजवळ अचानक स्फोट झाला आणि त्यात आग लागली. या भीषण अपघातात चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 22 प्रवासी भाजल्याने जखमी झाले आहेत. यातील चौदा जणांना कटरा येथील नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरितांवर सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. धुराच्या लोटात पेटलेली बसची आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक JK14/1831 प्रवाशांना भरून कटराहून निघाली. बसमध्ये अचानक स्फोट होऊन बसचे आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की बसमधील प्रवाशांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. कटरा येथून अग्निशमन दल, पोलिस दल आणि रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या. मोठ्या कष्टाने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. आग आटोक्यात आणून प्रवाशांना बाहेर काढले तोपर्यंत एका मुलासह चार प्रवासी भाजून मरण पावले होते. तसेच 22 प्रवाशांना प्रथम रुग्णवाहिकेत बसवून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून चौदा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कटरा येथील नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले. (हेही वाचा -

तथापि, रियासीचे एसएसपी अमित गुप्ता यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात समोर आले की, बसच्या इंजिनाजवळून धूर निघू लागल्याने आग वेगाने लागली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दुसरीकडे बसमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग लागली. काही लोकांचे म्हणणे आहे की, धूर अगोदर उठला असता तर चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले असते. मात्र, याठिकाणी कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

मृतांच्या आश्रितांना जिल्हा प्रशासन 50-50 हजार रुपये देणार -

अपघाताची माहिती मिळताच डीसी रियासी बाबीला रकवाल रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून उपचारात कोणतीही कुचराई करू नये, अशा सूचना डॉक्टरांना दिल्या. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.