Indian Air Force Recruitment: भारतीय वायु दलात बंपर भरती, या ग्रुप सी पदांसाठी त्वरीत अर्ज करा
India Air Force (Photo Credit - File)

भारतीय वायु दलात 'Group C' नागरी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय वायु दलाच्या (AIR Force Group C) च्या भरती अंतर्गत एलडीसी, एमटीएस, कुक, फायरमन आणि ड्रायव्हरसह इतर अनेक पदांवर (Goverment Gob) भरती घेण्यात आली आहे.  उमेदवारांच्या निवडीनंतर, आग्रा आणि उत्तर प्रदेशमध्ये नियुक्ती केली जाईल. ही भरती (10th passed to graduate jobs in IAF) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. (हे ही वाचा पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास महिलेला महिन्याला 1,000 रुपये देऊ, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा.)

या जागांसाठी भरती

कुक (Cook)

एमटीएस (MTS)

एलडीसी (LDC)

अधीक्षक (Superintendent)

सुतार (Carpenter)

सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver)

 फायरमन आणि ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कुक (Cook) - प्रमाणपत्र किंवा कॅटरिंगमधील डिप्लोमासह मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण. तसेच संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव

एमटीएस (MTS) - 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एलडीसी (LDC) - मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास. तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.

अधीक्षक (Superintendent) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष.

सुतार (Carpenter) - मान्यताप्राप्त संस्थेतील ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी पास.

फायरमन (Fireman) - अग्निशमन प्रशिक्षणासह 10वी पास.

सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver) - उमेदवार परवान्यासह 10वी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianairforce.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.