Jammu-Kashmir Update: जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफकडून 36 किलो हेरॉईन, पिस्तुल मॅगझीनसह जिवंत काडतुसेही जप्त, तीन पाकिस्तानी तस्कर ठार
BSF (Pic Credit - Twitter)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सांबा (Samba) येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने (BSF) शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ड्रग्सची (Drugs) मोठी खेप जप्त केल्यानंतर तीन पाकिस्तानी तस्करांना ठार केले. बीएसएफने घटनास्थळावरून 36 किलो हेरॉईन, एक पिस्तुल मॅगझीन आणि काही जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. बीएसएफने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जम्मूमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बीएसएफचे आयजी डीके बुरा म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमा सध्या दाट धुक्याने झाकलेली आहे आणि या दाट धुक्याचा फायदा घेत शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पाकिस्तानने अमली पदार्थांची मोठी खेप भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले की, सीमेवर पाळत ठेवणाऱ्या उपकरणांना सीमेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. या हालचालींनंतर फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या सैनिकांना इशारा देण्यात आला. त्यानंतर तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनीही या भागावर लक्ष ठेवले आणि या हालचाली तारबंदीजवळ पोहोचताच सैनिकांनी या लोकांना आव्हान दिले आणि त्यानंतर गोळीबार केला ज्यामध्ये तीन घुसखोर ठार झाले. हेही वाचा Asaduddin Owaisi Attack: असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेसाठी 101 बकऱ्यांचा बळी, हैदराबादी व्यावसायिकाचे अजब कृत्य

शोध मोहिमे दरम्यान घटनास्थळावरून 36 पाकिटे जप्त करण्यात आली असून प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे 1 किलो आहे.  झडती दरम्यान या घुसखोरांकडून इटलीतील पिस्तूल, काही मॅगझिन आणि काडतुसेही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बीएसएफने दावा केला आहे की काही काळापासून पाकिस्तानने सीमेवर अशा अनेक कारवाया करण्याचा प्रयत्न केला ज्या शेवटपर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट झाल्या.

बीएसएफने असाही दावा केला आहे की गेल्या एक आठवड्यापासून त्यांना सतत माहिती मिळत होती की पाकिस्तान सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात पाठवू शकतो. त्यानंतर सुरक्षा दल सतर्क होते आणि आता त्यांना हे मोठे यश मिळाले आहे.  बीएसएफने दावा केला आहे की पाकिस्तानने काही काळापासून असे 4 प्रयत्न केले की मादक पदार्थांची केप भारतात पाठवली जाईल, परंतु सैनिकांनी हे प्रयत्न पूर्ण होऊ दिले नाहीत. याशिवाय सीमेवर यापूर्वी 9 पाकिस्तानी घुसखोर मारले गेले आहेत.