BSF Constable Commits Suicide: मध्य प्रदेशातील बाणगंगा पोलिस ठाण्यांतर्गत रेओटी रेंजमध्ये बीएसएफच्या एका कॉन्स्टेबलने सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडली. आत्महत्यानंतर लष्कर दलात शोक पसरला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. शेअर बाजारात पैसै गमावल्याने तो डेप्रेशनमध्ये होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा संशय कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. (हेही वाचा- डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या धोक्याबाबत आरोग्य विभाग सतर्क, आरोग्य सचिवांनी ॲडव्हायझरी केली जारी)
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज मलाकर (29) असं आत्महत्या करणाऱ्या बीएसएफच्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो खंडवा येथील रहिवासी होती.गेल्या वर्षापासून तो शूटिंग रेंजमध्ये तैनात होता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांना फोन चार्ज करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. नंतर तो शस्त्रागारात पोहोचला आणि त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.
गोळीबाराचा आवाज ऐकून सहकारी घटनास्थळी पोहोचले मात्र त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली. धीरज यांच्या मामाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, त्याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती परंतु त्याचा तोटा झाला आणि त्यांना त्याच्या नुकसाना बद्दल माहिती दिली होती. त्या आर्थिक मदतीसाठी कुटुंबियांनी मदतीचा हात दिला होता तरी देखील त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर धीरज यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाकडून जबाव नोंदवला आहे.