जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेले आग्रातील ताजमहालमध्ये (Taj Mahal) बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या जवानांनी ताजमहालमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीने बाहेर काढले. याचबरोबर ताजमहालचे तिन्ही दरवाजे बंद करण्यात आले होते. त्याचवेळी बॉब्म शोधक पथकही ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या संपूर्ण परिसरातील चौकशी केल्यानंतर अखेर सत्य समोर आले आहे. ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन हा खोडसाळपणे केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज (4 मार्च) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास पोलिसांना ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताजमहलचे पूर्व आणि पश्चिम दिशेची दोन्ही प्रवेशद्वारे बंद केले. यासोबतच ताजमहालच्या बाहेर असलेला बाजारही पोलिसांनी बंद केल्या होत्या. परंतु, चौकशीदरम्यान बॉम्ब शोधक पथकाला परिसरात कुठेही बॉम्ब आढळला नाही. तसेच ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन हा खोडसाळपणे केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले होते. हे देखील वाचा- Mumbai Pune Express Way Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघात; पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, चालकाचा मृत्यू
महत्वाचे म्हणजे, ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्याची सूचना देण्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांनी लोकेशनचा शोधण्यास सुरुवात केली. ती व्यक्ती फैजाबादची असल्याची माहिती आग्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिव राम यादव यांनी दिली आहे. त्या व्यक्तीला नंतर अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती आऊट लूकने आपल्या वृत्तात दिली आहे.