Mumbai Pune Express Way Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघात; पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, चालकाचा मृत्यू
Accident Representational image (PC - PTI)

Mumbai Pune Express Way Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचारा सुरू आहेत. बुधवारी साडेबाराच्या सुमारास खालापूरजवळ हा भीषण अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार, पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी एक ट्रक उभा होता. या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली. यात पुढे उभ्या असलेल्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तसेच मागील ट्रकमधील दोन जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वाचा - Fact Check: ठाण्यातील Balkum येथे मेट्रो पिलर रस्त्यावरील वाहनांवर कोसळला? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य)

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघातांची मालिक सुरूचं असते. मागील महिन्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो, ट्रेलर, कारचा विचित्र अपघात झाला होता. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा अपघात झाला होता.

मुबंई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर एका कंटेनरने मागच्या बाजूने टेम्पोला धडक दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. परिणामी मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.