Bokaro Road Accident: झारखंडमधील बोकारो-रामगढ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी बोकारोच्या कास्मार पोलीस स्टेशन हद्दीतील दंतू गावाजवळ घडला आहे. बर्मोचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) बीएन सिंग यांनी सांगितले की, चारचाकी गाडी जाममध्ये अडकलेल्या ट्रकला मागून धडकली होती. एसडीपीओ म्हणाले की, चारचाकी वाहनात सुमारे आठ जण प्रवास करत होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. सिंह यांनी सांगितले की, जखमींना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे देखील वाचा: Free Aadhaar Card Update: UIDAI ने वाढवली मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत; 2025 पर्यंत असेल संधी, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया
रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकूण आठ जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनी सांगितले की, या अपघातापूर्वी या रस्त्यावर आणखी एक अपघात झाला होता ज्यात एकाचा मृत्यू झाला होता, ज्याच्या निषेधार्थ स्थानिक लोकांनी रास्ता रोको केला होता.