Mumbai Beat Hyderabad IPL 2025: मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव, विल जॅक्सने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली कमाल

मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 17.1 षटकात लक्ष्य गाठले.

Mumbai Beat Hyderabad IPL 2025: मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव, विल जॅक्सने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली कमाल
MI (Photo Credit - X)

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 18.1 षटकात लक्ष्य गाठले.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 162 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने 40 धावांची सर्वाधिक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 28 चेंडूत सात चौकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, हेनरिक क्लासेन 37 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून स्टार अष्टपैलू विल जॅक्सने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. विल जॅक्स व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 18.1 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्सने 36 धावांची सर्वाधिक खेळी केली. खेळीदरम्यान, त्याने 26 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 26 धावांचे योगदान दिले. त्याच वेळी, पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2025 11:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).