
Devendra Fadnavis On Marathi Language: आज महाराष्ट्र सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून पहिली ते पाचवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी तसेच इंग्रजी शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा असेल, असं जाहीर केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया देत मराठी भाषेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवणे सक्तीची असली तरी राज्यात मराठी बोलणे अनिवार्य असेल. तथापी, यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून मराठी भाषा सक्तीची करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भर दिला.
मुंबई मेट्रो लाईन 7 ए बोगद्याच्या यशस्वी अंमलबजावणी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांना संबोधित करताना फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही आधीच नवीन शिक्षण धोरण लागू केले आहे. धोरणानुसार, आम्ही प्रयत्न करत आहोत की सर्वांना मराठी तसेच देशाची भाषा कळावी. हे धोरण संपूर्ण भारतात एकाच सामान्य संवादी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. तथापी, महाराष्ट्र सरकारने आधीच मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा यासाठी पावले उचलली असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Hindi Third Language In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू)
राज्यात मराठी बोलणे अनिवार्य असेल - देवेंद्र फडणवीस
यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, केंद्राने हे धोरण आखले जेणेकरून देशात एकच संवादी भाषा असेल. तथापि, महाराष्ट्रात, आम्ही आधीच मराठी सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी बोलणे आवश्यक आहे, परंतु जर त्यांना हवे असेल तर ते इतर कोणतीही भाषा शिकू शकतात. (हेही वाचा, Unauthorized Schools in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यास धोका; राज्यातील जवळपास 4,000 अनधिकृत शाळांबद्दल MESTA ने व्यक्त केली चिंता)
दरम्यान, विविध राज्यांमध्ये भाषा धोरणांवर, विशेषतः प्रादेशिक भाषांच्या वापराबाबत, चालू असलेल्या वादविवाद आणि चर्चांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे हे महत्त्वपूर्ण विधान आले आहे. फडणवीस यांनी यापूर्वी 2 एप्रिल रोजी टिप्पणी केली होती की, मराठी भाषेच्या संवर्धनाची वकिली करणे चुकीचे नसले तरी ते नेहमीच कायद्याच्या मर्यादेत राहिले पाहिजे. आंदोलन कायदेशीर असले पाहिजे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य सहन करणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले होते. मराठी भाषेचा अनादर केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या घटनेचा संदर्भ देतानी त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.
या घटनेला प्रतिसाद म्हणून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना राज्यभरातील बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन थांबवण्याचे निर्देश दिले होते.