ख्रिश्चन धर्मग्रंथांनुसार, येशू ख्रिस्ताचा त्यांच्याच शिष्यांपैकी एक, जूडसने 30 नाण्यांसाठी विश्वासघात केला. गेथ्समनी बागेत रात्रीच्या वेळी येशूला रोमन सैनिकांनी अटक केली. त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना रोमन गव्हर्नर पॉन्शियस पायलटने क्रूसावर चढवण्याची शिक्षा सुनावली.
...