Body of missing child found in school premises PC TWITTER

Bihar Shocker: बिहारच्या पाटणा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेच्या परिसरात तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आले आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला आग लावली आहे. पाटणाच्या रस्त्यावर संतपलेले पालक शाळेचा निषेध करत आहे. तीन वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबानी सर्वीकडे त्याचा शोध घेतला होता त्यानंतर शाळेच्या परिसरात शोध घेतला तेव्हा मुलाचा मृतदेह शाळेच्या परिसरात आढळून आला. (हेही वाचा- पाळीव कुत्रा घरात शिरला म्हणून चिडला शेजारी; प्राण्याच्या मालकासह पत्नीवर केला लाठी हल्ला, घटना CCTV मध्ये कैद (Watch)

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलाचा शोध घेताना शाळेच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबाना उडवाउडवीची उत्तरे देत होती त्यामुळे कुटुंबाना संशय वाढला होता. शाळेच्या परिसरात असलेल्या गटारात मुलाचा मृतदेह कुटुंबाला आढळून आला. या घटनेनंतर कुटुंबाने शाळेच्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. या दु:खद घटनेनंतर शाळेजवळ संतप्त जमावाने अनेक वाहने आणि भिंतीचे काही भाग पेटवले आहे.

या घटनेनंतर शाळेच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिस आणि अधिकाऱ्यांना या घटनेची त्वरीत सूचना देण्यात आली, त्यामुळे पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पटनाचे पोलिस अधिक्षक चंद्र प्रकाश यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरु आहे. या संदर्भात पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. मूलाने शाळेत प्रवेश केला आहे, परंतु तो शाळेच्या बाहेर पडताना फुटेजमध्ये दिसला नाही त्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापनेवर संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी खूनाचा संशय घेत तिघांना अटक केले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु केली आहे. पोलिस या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापकांची चौकशी आणि तपासणी करत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.