BJP Membership Drive (फोटो सौजन्य - X/@amit__tandon)

BJP Membership Drive: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्यता अभियान 2024 (Membership Drive 2024) ने शुक्रवारी एक नवीन टप्पा गाठला. केवळ 18 दिवसांत 4 कोटी सदस्यांनी पक्षाचे सदस्य म्हणून नावनोंदणी केली आहे. भाजपने आपल्या X हँडलवर पोस्ट करत आणि स्वयंसेवक आणि उत्साही लोकांना 88 00 00 2024 वर मिस कॉल देऊन या 'क्रांतीचा' भाग होण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनीही सोशल मीडियावर लोकांना सदस्यत्व मोहीम ज्या वेगाने पुढे जात आहे आणि त्यातून नवीन इतिहास कसा निर्माण होत आहेत याची माहिती दिली आहे.

भाजपचे सदस्यत्व अभियान सातत्याने इतिहास रचत आहे. भाजपच्या सदस्यत्व मोहिमेने अवघ्या 18 दिवसांत 4 कोटी सदस्यांचा आकडा पार केला आहे. अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या भाजप सदस्यत्व अभियान 2024 ला देशवासीयांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे, त्याचा पुरावा म्हणजे हे 4 कोटी सदस्य आहेत, असे तावडे यांनी X वर सांगितले आहे. (हेही वाचा -BJP Membership Drive: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या राष्ट्रव्यापी सदस्यत्व मोहिमेची सुरुवात; प्राथमिक सदस्य म्हणून केली नावनोंदणी)

विनोद तावडे यांची एक्स हँडलवरील पोस्ट -  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित भारताकडे वाटचाल करत असून प्रत्येक नागरिक भाजपचा सदस्य होऊन त्यात योगदान देत असल्याचेही तावडे यांनी सांगितलं आहे. तसेच 88 00 00 2024 वर मिस्ड कॉल देऊन किंवा नमो ॲपद्वारे भाजपचे सदस्य बनून सदस्यत्व मोहिमेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघ) बीएल संतोष यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये संख्येच्या बाबतीत चांगले परिणाम नोंदवले जात आहेत. भाजपच्या सदस्यता अभियानाने 4 कोटींचा टप्पा गाठला आहे. यूपीने 1 कोटींचा आकडा पार केला, एमपीने 50 लाखांचा टप्पा पार केला. गुजरातने आधीच 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आसाम 35 लाखांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.