
जम्मू काश्मिरमध्ये पुलवामा (Pulwama) भागामध्ये सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सुमारे 40 जवानांचा प्राण जागीच गेला. भारतीय सुरक्षा जवानांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर देशभरात रोष आणि संताप व्यक्त केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सैन्य दल आणि अगदी सामान्यांनी भारतावरील हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं म्हटलं आहे. शहिदांसाठी कुठे वर्गणी गोळा केली जात आहे तर कुठे कॅन्डल मार्च काढला जात आहे. मात्र बीकानेरच्या तरूणाने चक्क पाठीवर शहिदांच्या नावांचा टॅटू (tattoo) गोंदवला आहे. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट
राजस्थानमधील बिकानेर या शहरातील एका व्यक्तीने श्रद्धांजली देण्यासाठी पाठीवर तिरंगा काढला आहे तसेच शहिदांची नावं देवनागरीमध्ये गोंदवून घेतली आहे. सध्या राजस्थानच्या गल्लीपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत टॅटू गोंदवणार्या या गोपाल चरणची चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पाठीवर 71 शहिदांची नावं आहेत. यामध्ये पुलवामाच्या 42 नावं शहिदांची नावं, बिकानेरच्या 20 आणि रतनगडच्या 9 जवानांची नावं आहेत. बिकानेर हे डिव्हिजनल हेडक्वॉर्टर असुनदेखील तेथे शहिदांचे स्मारक नसल्यने गोपालने नाराजी व्यक्त केली आहे.