Bihar Fire News : लग्नघरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सिलिंडरचा स्फोट; ६ जण जखमी
Fire | Pixabay.com

Darbhanga News: बिहार (Bihar )च्या दरभंगा भागात लग्नघरात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. फटाक्यांच्या (firecracker) आतिशबाजीने सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. कुटुंबातील ६ जणांना गंभीर दुखापत ( 6 people injured) झाली आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि अग्नीशनमदल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, अंटोर गावातील ही घटना आहे. घरात लग्नकार्य सुरु होते. या लग्नकार्यादरम्यान काही लोकांनी फटाके लावले. त्या दरम्यानच फटाके लावल्यानंतर फटाक्यांची ठिणगी जवळ असलेल्या घराबाहेर पडली आणि क्षणार्धात आग संपूर्ण घराला लागली.

घराबाहेर लागलेली आग घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचल्याने काही वेळातच या आगीमुळे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली, ज्यामुळे त्यामुळे परिस्थीती आणखी खराब झाली. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळांचा भडका उडू लागला.

लागलेल्या आगीमुळे सर्वत्र आरडाओरडा पसरला. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण इकडे तिकडे धावू लागला. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोट दूरवर पसरले. त्यामुळे परिसरातील चांगलेच घबरले होते. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेत एका कुंटुंबातील सहा जण भाजले गेले.