भारतात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली आहे. तसेच कोरोना विषाणुमुळे (Coronavirus) अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बिहार (Bihar) येथील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. प्रशासनाला (Corona Help Center)2 कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सीतामढी (Sitamarhi) जिल्ह्यातील मधोल (Madhaul) गावात घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती एका हिंदी वेबसाईट याबाबत वृत्त दिले आहे.
बबलू कुमार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदीची घोषणा केली होती. यामुळे अनेकांनी काम नसल्यामुळे गावी पायी जाण्याचा प्रवास सुरु केला आहे. दरम्यान, सीतामढी जिल्ह्यातील मधोल गावातील एकाच कुटुंबातील 2 जण महाराष्ट्रातून आपल्या घरी परतले होते. याची माहिती बबलूने कोरोना हेल्पलाईनाला फोनच्या माध्यमातून दिली. बबलूने कोरोना संशयितांची माहिती प्रशासनाला दिली म्हणून दोघेही संशयित संतापले होते. त्यानंतर आरोग्य विभागाला चाचणीसाटी नमुने दिल्यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर 5 जणांच्या मदतीने बबलू बेदम मारहाण केली. यात बबलूचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन 7 आरोपींच्याविरोधात गुन्हा दाख केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. हे देखील वाचा- देशात लॉकडाऊन असताना 6 कोरोना बाधितांची दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी; सरकारकडून उपस्थितांची चाचणी
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.