Onion | Representational image (Photo Credits: pxhere)

कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली असून 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Onion Export Allowed: भारतातून श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीस होणार कांदा निर्यात; सरकारची मान्यता, प्रत्येकी 10 हजार टनाची मर्यादा)

पाहा पोस्ट -

महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून गुजराला एक न्याय व महाराष्ट्राला वेगळा न्याय का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो.

केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे. पण, मित्र देशांना काही प्रमाणात कांदा निर्यात केला जात असल्याचे दिसत आहे. कांदा निर्यातीचा निर्णय घ्यायला सरकार इतके दिवस झोपलं होतं का?, असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला.