मध्य प्रदेश: प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने IPS अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण
Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावर सध्या मध्य प्रदेशमधील पोलीस महासंचालक (Director General) पुरुषोत्तम शर्मा (Purushottam Sharma) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शर्मा आपल्या पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, शर्मा यांना प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी पत्नीला मारहाण केली. या व्हिडिओमध्येदेखील पुरुषोत्तम शर्मा त्यांच्या पत्नीला खाजगी गोष्टींमध्ये न येण्यास सांगत आहेत. या सर्व प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आज तक या हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने या प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याशिवाय पुरुषोत्तम शर्मा यांनी आपण कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी शर्मा यांना आपल्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. (हेही वाचा -Rape Case In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; सीआरपीएफ जवानाला अटक)

दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक उपेंद्र जैन यांनी सांगितलं की, अद्याप या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नाही. ज्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडीओ पाठवला आहे, त्या व्यक्तीचा दावा आहे की तो त्यांचा मुलगा आहे. परंतु, या व्हिडीओची सत्यता अद्याप तपासण्यात आलेली नाही. शर्मा यांच्या घरी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पाठवण्यात आले होते. परंतु, शर्मा यांच्या पत्नीने या प्रकरणी तक्रार देण्यास नकार दिला असल्याचंही जैन यांनी सांगितलं.

प्राप्त माहितीनुसार, पुरुषोत्तम शर्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये झालेल्या वादाचे कारण शर्मा यांचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले संबंध हे आहे. या कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.