Rape Case In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; सीआरपीएफ जवानाला अटक
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

Rape Case In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील अतर्रा पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सीआरपीएफ जवानाला (CRPF Jawan) अटक करण्यात आली आहे. या जवानाविरोधात 12 जुलै रोजी चित्रकूट जिल्ह्यातील (Chitrakoot District) सतरा वर्षांच्या विद्यार्थिंनीने प्राणघातक हल्ला आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. अतर्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनीस सिंह यांनी सांगितलं की, रविवारी दुपारी सीआरपीएफ जवान बृजेश कुशवाहा (वय 39) ला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित विद्यार्थिनी 5 जून रोजी बृजेश कुशवाहा यांच्या धरी भाड्याची खोली शोधण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी बृजेशने या विद्यार्थिनीला मारहाण करत बलात्कार केला. त्यानंतरच्या काळात तो झारखंडला तैनात होता. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही. (हेही वाचा - धक्कादायक! दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री)

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशावर कोरोना विषाणूचं सावट असताना बलात्कार तसेच गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी राज्यात 4,412 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 3 लाख 82 हजार 835 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 5 हजार 517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.