Bank Scheme: जेष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकांनी सुरु केली एफडी योजना, जाणून घ्या नक्की काय आहे योजना ?
Bank (Photo Credit: PTI)

एसबीआय (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी (FD) योजना चालवतात. ही योजना 30 सप्टेंबर रोजी बंद होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना बँकांनी (Bank) गेल्या वर्षी मे 2020 मध्ये सुरू केली होती. या विशेष मुदत ठेव योजने (Scheme) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर देतात. परंतु विशेष FD मध्ये, त्या व्याज दरावर अतिरिक्त व्याज (Intrest) दराचा लाभ दिला जात आहे. निवडलेल्या परिपक्वता कालावधीसह मुदत ठेवींमध्ये, ज्येष्ठ नागरिकांना लागू व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज मिळते. म्हणजेच नियमित ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा 1 टक्के अधिक व्याज मिळते.बँकांनी या योजनेला अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे.

ही योजना आधी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, नंतर 31 डिसेंबर, नंतर 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली, मार्च नंतर ती 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली, नंतर ती 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या SBI ने मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WE CARE वरिष्ठ नागरिक मुदत ठेव योजना जाहीर केली होती.

या अंतर्गत 5 वर्षांपेक्षा जास्त FD वर ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.80 टक्के जास्त दर व्याज मिळेल. सध्या, सामान्य लोकांना 5 वर्षांच्या FD वर 5.40 टक्के दराने व्याज मिळत आहे. परंतु, ज्येष्ठ नागरिकांना विशेष योजनेअंतर्गत 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या एफडीवर 6.20 टक्के दराने व्याज मिळेल. हेही वाचा Vinesh Phogat हिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रीन सिग्नल, पण WFI ने आजीवन बंदीची दिली चेतावणी

बँक ऑफ बडोदामध्ये विशेष ज्येष्ठ नागरिक FD योजने' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 100 आधार गुण म्हणजेच 1% अधिक व्याज देत आहे. बँक 5 ते 10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.25% दराने व्याज देत आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना आहे.

ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ICICI बँक गोल्डन इयर्स' नावाची योजना चालवते.  या अंतर्गत ज्या वृद्धांना FD आहे त्यांना सामान्य लोकांपेक्षा 80 बेसिस पॉइंट जास्त व्याज दिले जाते. म्हणजेच, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत एफडी करण्यासाठी 6.30% व्याज मिळत आहे.

एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सीनियर सिटीझन केअर एफडी' नावाची योजना सुरू केली होती. या अंतर्गत बँक FD वर 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम देत आहे. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्याच्या 0.50 टक्के प्रीमियमपेक्षा जास्त आहे. ही योजना 5 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. म्हणजेच, एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी मध्ये उपलब्ध व्याज दर 6.25 टक्के आहे.