Meat Shop (फोटो सौजन्य - फेसबुक)

Meat Shops Closed During Navratri In Ayodhya: आगामी नवरात्रोत्सवाच्या (Navratri 2024) पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात (Ayodhya District) 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत मांस, चिकन, मासे इत्यादी विक्री करणारी सर्व दुकाने बंद (Meat Shops Closed) राहतील. यासंदर्भात मंगळवारी एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. अधिकृत आदेशानुसार, जे या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 (Food Safety and Standards Act 2006) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नवरात्रीमध्ये मांसाची दुकाने राहणार बंद -

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त माणिक चंद्र सिंह यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, 'आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, अयोध्या जिल्ह्यात 03.10.2024 ते 11.10.2024 पर्यंत, मासे, बकरी, कोंबडीची सर्व मांसाची दुकाने, बंद राहतील. जर या काळात सामान्य जनता या दुकानात मांस विक्री व साठवणूक करत असेल तर विभागाला दूरध्वनी क्रमांक- 05278366607 वर कळवावे. वरील आदेशाचे पालन न केल्यास अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत संबंधित खाद्य व्यापाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.' (हेही वाचा -Thane: मटन शॉपमधून 12 बोकड चोरीला, थर्टी फर्स्टच्या तोंडावर दुकानदारास भुर्दंड; गुन्हा दाखल)

दरम्यान, गुरुवारी 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होणार आहे. शारदीय नवरात्री हा नऊ दिवसांचा सण आहे, जो भारतातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा नवरात्रीचा शेवटचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवरात्रीची समाप्ती होते. (हेही वाचा - (हेही वाचा - Goat Viral Video: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ)

विजयादशमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. नवरात्रीचा सण विशेषतः देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेला समर्पित आहे. नवरात्री काळात भक्त नऊ दिवश उपवास करतात. पौराणिक कथेनुसार, रावणाचा वध करण्याआधी आणि सीता मातेची सुटका करण्यापूर्वी भगवान राम आणि त्याची पत्नी सीता यांना नऊ दिवस देवी दुर्गेची उपासना केली होती. त्यामुळे हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.