अयोध्या निकाल (PC - PTI)

Ayodhya Verdict: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 9 नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीप्रकरणी अंतिम निर्णय जाहीर केला. या प्रकरणात हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर मशिदीसाठी अयोद्धेत 5 एकर जागा देण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आलं. परंतु, काहींनी या निकालावर नाराजी दर्शवली आहे. वादग्रस्त बंगाली लेखिका तसलीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी या निर्णयाबाबत एक सवाल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 2.77 एकर जमीन हिंदूंना मंदिरासाठी देण्यात आली आहे. तर मुस्लिमांनाही मशीदीसाठी 2.77 एकर जागा द्यायला हवी होती. त्यांना 5 एकर जमीन का देण्यात आली?’, असा सवाल त्यांनी केला आहे. (हेही वाचा - Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करणाऱ्या 'या' 5 न्यायाधिशांबाबत जाणून घ्या)

तसलीमा नसरीन यांचं ट्विट - 

त्यांच्या या ट्विटला अनेकांनी उत्तर दिलं असून काहींनी तुम्हाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल घडवायची आहे का? असा सवाल केला आहे. तसलीमा नसरीन नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

हेही वाचा - Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी सुन्नी वफ्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत, पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

दरम्यान, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्य वादग्रस्त भूमी ही रामल्लाच्याच हक्काची असल्याचे मान्य केले आहे. पुढील तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करून मंदिर बांधणीस सुरुवात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयाने आज देशभरातील मोठा वाद संपुष्टात आल्याचे म्हंटले जात आहे.