'5 एकर जमीनीची खैरात आम्हाला नको', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी नाराज
Asaduddin Owaisi (Photo Credits-Facebook)

रामजन्मभूमी (Ram Mandir) आणि बाबरी मशीद (Babri Masjid) वादावरील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयावर एआयएमआयएमचे (AIMIM)अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच ओवैसी यांची पत्रकार परिषेद पार पडली. दरम्यान, सुप्रिम कोर्ट सुप्रिम आहे. परंतु, अचूक नाही, असे ओवैसी वारंवार उल्लेख करत होते. तसेच आम्हाला सविधानावर पूर्ण विश्वास आहे, आमच्या हक्कासाठी आम्ही लढत होतो. दान स्वरुपात मिळालेली 5 एकर जमीनीची मुस्लिमांना खैरात नको असेही ते म्हणाले आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसह एमआयएम पक्षदेखील न्यायालयाच्या निर्णयावर संतुष्ट नाही, असेही ते म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आयोध्या प्रकरणी आज इतिहासीक निर्णय दिला आहे. देशाभरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केल जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "जर त्या जागेवर आजही मशीद असते तर, सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या बाजूने निर्णय दिला असता.आम्हाला भारताच्या सविधानावर विश्वास आहे. आमच्या हक्कासाठी आम्ही लढत होतो. महत्वाचे म्हणजे, 5 एकर जमीनीची आम्हाला खैरात नको. आम्ही मुस्लिम आहोत. परंतु, मशीद उभारण्यासाठी आम्ही एकत्र येऊन पैसा जमा करु शकतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्व मुस्लिम पक्षाने नाकारले पाहिजे", असे ओवैसी म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, ओवैसी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. भारत देश हा हिंदुत्वाकडे जात असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याची सुरुवात आयोध्यापासून केली आहे, असा आरोपही ओवैसी यांनी केला आहे.