
Delhi Accident: दिल्लीतील लोधी रोड परिसरात एका भरधाव ऑडी कारने स्कूटरला धडक दिली. त्यानंतर ती कार झाडावर आदळली. सोमवारी रात्री हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात (Accident) स्कूटरवरून प्रवास करणारे दोघे जण आणि आणखी एक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. (Bira Beer: नावातून केवळ एक शब्द काढून टाकल्याने बिरा बियर मेकर B9 Beverages Pvt. Ltd. ला तब्बल 80 कोटींचे नुकसान, जाणून घ्या सविस्तर)
गाडी झाडाला धडकली
View this post on Instagram
अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये, लाल ऑडी कारचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणात खराब झालेला दिसत होता. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (अविचारीपणे गाडी चालवणे) आणि कलम 337 (दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपास सुरू आहे आणि पुढील कारवाई केली जाईल.