![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/11/Murder--380x214.jpg)
बेंगळुरूमध्ये (Bangalore) एका वेड्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा भरदिवसा भोसकून खून (Murder) केला. या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणाने त्याच्या माजी प्रेयसीला मंगळवारी पूर्व बंगळुरूमधील तिच्या कार्यालयाबाहेर 16 पेक्षा जास्त वेळा भोसकले. यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच जीवन भीमा नगर पोलिसांनी (Jeevan Bhima Nagar Police) आरोपीला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी पीडितेची ओळख लीला पवित्रा नालामाथी अशी केली असून ती आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील रहिवासी आहे.
लीला मुरुगेशपल्यातील ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची कर्मचारी होती. दुसरीकडे, आरोपी दिनाकर बनाला हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमचा रहिवासी असून तोही डोमलूर येथील एका कंपनीत आरोग्य कर्मचारी आहे. दीनाकर आणि लीला पाच वर्षांपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. हेही वाचा LPG Cylinder Price: महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ
मात्र दिनाकर हा दुसऱ्या जातीचा असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. डीसीपी गुलेद यांनी सांगितले की लीलाने दिनाकरला सांगितले होते की तिचे कुटुंब लग्नासाठी तयार नाही आणि त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीलाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर दिनाकर रागावला. यानंतर दिनाकर पूर्ण तयारीनिशी लीलाच्या ऑफिसमध्ये आला आणि तिची तिथे वाट पाहू लागला. त्याचवेळी ती कार्यालयातून बाहेर पडताच दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर संतापलेल्या दिनाकरने चाकू काढून सर्वांसमोर 16 हून अधिक हल्ले केले. या हल्ल्यात लीला गंभीर जखमी झाली, त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.