Mann Ki Baat | (Photo Credits: narendramodi.in)

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (28 जुलै) त्यांच्या मासिक रेडिओ शो 'मन की बात' (Mann Ki Baat) च्या 112 व्या भागाला संबोधित केले. लोकसभा निवडणुकीनंतरचे हे त्यांचे दुसरे भाषण होते. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर झाल्यानंतरचे पंतप्रधानाचे हे पहिले भाषण होते. मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, सध्या पॅरिस ऑलिम्पिक जगभरात चर्चेत आहे. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक पटलावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते. तुम्हीही तुमच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, भारताचा जयजयकार करावा.

यावेळी पंतप्रधान मोदींनी गणित ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी गणिताच्या जगात एक ऑलिम्पिकही आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्ण पदके व एक रौप्य पदक जिंकले. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 100 हून अधिक देशांतील तरुण सहभागी होतात. आमच्या संघाने पहिल्या पाच देशांमध्ये यशस्वीपणे स्थान मिळवले आहे. (हेही वाचा -CRPF Raising Day 2024: PM नरेंद्र मोदी यांनी दिल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलातल्या जवानांना स्थापनादिना निमित्त शुभेच्छा)

सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी प्रकल्प PARI -

सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी पारी प्रकल्प हे एक मोठे माध्यम बनत आहे. रस्त्याच्या कडेला, भिंतींवर बनवलेली सुंदर चित्रे तुम्ही पाहिली असतील. ही चित्रे आणि या कलाकृती त्याच कलाकारांनी बनवल्या आहेत जे PARI शी संबंधित आहेत. हे केवळ आपल्या सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यच वाढवत नाही तर आपली संस्कृती अधिक प्रसिद्ध होण्यास मदत करतात. अशा सुंदर चित्रातील रंगांनी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक महिलांच्या आयुष्यात समृद्धीचे रंग भरले आहेत. हातमाग उद्योगाशी निगडित या महिला छोटी दुकाने चालवून आपला उदरनिर्वाह करत होत्या. या महिलांनी 'UNNATI सेल्फ हेल्प ग्रुप'मध्ये सामील होऊन ब्लॉक प्रिंटिंग आणि डाईंगचे प्रशिक्षण घेतले. कपड्यांवर रंगांची जादू पसरवणाऱ्या या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. (PM Narendra Modi Ukraine Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनला भेट देणार; रशिया-युक्रेन संघर्षानंतर मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा)

ऑगस्ट महिना क्रांतीचा महिना - पंतप्रधान

मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, 7 ऑगस्ट रोजी आपण 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा करू. आजकाल हातमागाच्या उत्पादनांनी ज्या प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, ते खरोखरच खूप यशस्वी आणि जबरदस्त आहे. आता अनेक खाजगी कंपन्या AI च्या माध्यमातून हातमाग उत्पादने आणि टिकाऊ फॅशनचा प्रचार करत आहेत. खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून खादीच्या विक्रीत 400% वाढ झाली आहे. खादी आणि हातमागाच्या या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. बहुसंख्य महिला या उद्योगाशी निगडित आहेत, त्यामुळे त्यांना सर्वाधिक फायदाही होत आहे. तुम्ही अजून खादीचे कपडे घेतले नसतील तर या वर्षापासून सुरुवात करा. ऑगस्ट महिना आला आहे, स्वातंत्र्याचा महिना आहे, क्रांतीचा महिना आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात ड्रग्जच्या समस्येवरही भाष्य केले. जर कोणाकडे ड्रग्जशी संबंधित इतर काही माहिती असेल तर ते या नंबरवर कॉल करून 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'शी शेअर करू शकतात. 'मानस'शी शेअर केलेली प्रत्येक माहिती गोपनीय ठेवली जाते. मी सर्व लोकांना, सर्व कुटुंबांना, भारताला 'ड्रग्ज फ्री' बनवण्यात सहभागी असलेल्या सर्व संस्थांना MANAS हेल्पलाइनचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.