सध्या देशात अनेकजण वेगवेगळ्या डेटिंग अॅपचा (Dating App) वापर करताना दिसतात. मात्र, या डेटिंग अॅपवरून अनेकांकडून पैसे उकळल्याच्या घटनाही घडत आहेत. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारे 50 हून अधिक सीईओ आणि वरिष्ठ अधिकारी या डेटिंग अॅपच्या हनीट्रॅपमध्ये (Honeytraps) अडकले आहेत. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे.
गे, टान्सजेंडर, बायोसेक्स्यूअलसाठी असणाऱ्या 'ग्रींडर' (Grindr) या डेटींग अॅपचा गैरवापर करून दिल्लीतील 150 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांना या अॅपद्वारे अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचं रॅकेट उघड करण्यास यश आलं आहे. ग्रींडर या अॅपवर गेल्या 3 महिन्यात या टोळीने अनेकांना धमकावून तसेच मारहाण करून पैसे उकळले आहेत. (हेही वाचा - सर्वोच्च न्यायलयाचा राजकीय पक्षांना दणका; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर करण्याचे आदेश)
अशा प्रकार अडकवलं जात होतं जाळ्यात -
ग्रींडर या डेटींग अॅपद्वावरे चांगल्या पगारावर आणि पदावर काम करणाऱ्या व्यक्तींसोबत ओळख निर्माण केली जात असे. त्यानंतर त्यांच्यासोबत महिनाभर मैत्रीचं नात तयार करण्यात येत होतं. त्यानंतर काही दिवसांत त्या व्यक्तीला एका अज्ञात स्थळी डेटवर नेले जात असे. शरीरसंबधांच्या बहाण्याने या व्यक्तींचे छुपे व्हिडिओ काढले जायचे. त्यानंतर याच व्हिडिओच्या आधारे त्यांना धमकावून किंवा मारहाण करून पैसे उकळले जात असे.
ग्रींडरवरील या टोळक्याने आतापर्यंत 150 जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे. या टोळीत एकूण 6 जणांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी यातील 4 जणांना अटक केली असून अद्याप 2 जण फरार आहेत. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ग्रींडर अॅपवरील या टोळीच्या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत. मात्र, यातील अनेकांनी आपल्या कुटुंबियांच्या भीतीमुळे तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.