Photo Credit- X

Kaziranga National Park: आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह पावसाळ्यात मोठ्या विश्रांतीनंतर 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. सुरुवातीला, पुरानंतरच्या(Kaziranga National Park flood) रस्त्यांची स्थिती पाहता उद्यानाच्या केवळ तीनच रेंज पर्यटकांसाठी जीप सफारी सुविधांसह खुल्या केले जाणार आहे, असे उद्यान संचालक सोनाली घोष यांनी सांगितले. पर्यटन काळ हा दोन वेळेत होणार आहे. पहिला सकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे. तर, दुपारी 1.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे.

जीप सफारीला कोहोरा, बागोरी आणि बुरापहार पर्वतरांगांमध्ये दोन शिफ्टमध्ये परवानगी दिली जाणार आहे. सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामात पर्यटकांचा अनुभव आणि सुरक्षितता वाढवण्यावर भर दिला जाईल, असे घोष म्हणाले. चित्तथरारक प्राणी, समृद्ध जैवविविधता, एक शिंगे गेंडा सारख्या प्रतिष्ठित गोष्टींसाठी काझीरंगा नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. दरवर्षी मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्यावर उद्यान बंद केले जाते. पावसाळ्यात येणाऱ्या भीषण पुरामुळे या वर्षी जवळपास 200 जनावरांना जीव गमवावा लागला.