Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Army Team Assaulted Over Food Bill Payment: पंजाबमधील मनाली-रोपर रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयाच्या (ढाबा) मालक आणि कामगारांनी आर्मी मेजर आणि 16 सैनिकांच्या टीमवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी भोजनालय मालक आणि व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली असून हल्ल्यात सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. लडाख स्काउट्सचे मेजर सचिन सिंग कुंतल आणि त्यांचे सैनिक लाहौलमध्ये आयोजित स्नो मॅरेथॉन जिंकून मनालीहून परतत असताना सोमवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिक रात्री 9.15 च्या सुमारास रोपर जिल्ह्यातील भरतगढजवळील अल्पाइन ढाब्यावर जेवणासाठी थांबले. कर चुकवण्यासाठी रोख रकमेचा आग्रह धरून मालकाने UPI द्वारे जेवणाचे बिल भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. (हेही वाचा -6 Pakistani Arrested in Gujrat : गुजरात एटीएस, एनसीबीची मोठी कारावई; पोरबंदरमधून 6 पाकिस्तानींसह 450 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

जवानांनी ऑनलाइन बिल भरल्यानंतरही वाद वाढला. 30-35 जणांच्या टोळक्याने अधिकारी आणि इतर जवानांवर हल्ला केला. त्यांना लाठ्या आणि लोखंडी रॉडने धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात मेजरला हाताला व डोक्याला दुखापत झाली आणि ते बेशुद्ध पडले. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

तथापी, जेवणाच्या बिलावरून वाद उद्धभवण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अनेक वेळा विविध ठिकाणी बिलावरून हाणामारीच्या घटना घडतात. अनेकदा यातील काही घटनांमध्ये वाद इतका विकोपाला पोहोचतो की, यात दोन्ही गटापैकी एकाचा जीव जातो. किरकोळ वादाचे रुपांतर गुन्हेगारी घटनांमध्ये होते.