Satyendar Jain Ka Darbaar: तिहार तुरुंगातून दिल्ली सरकारचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) नेते सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन हे निलंबित तुरुंग अधीक्षक अजित कुमार यांच्यासोबत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन निलंबित तुरुंग अधीक्षक अजित कुमार यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अजित कुमारवर सत्येंद्र जैन यांना तुरुंगात सुविधा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कारवाई करत त्यांना निलंबित करण्या आले आहे.
तिहार तुरुंगात बंद असलेल्या सत्येंद्र जैनचा हा व्हिडिओ 12 सप्टेंबरचा आहे. यापूर्वी तुरुंगातून सत्येंद्र जैन यांचे दोन व्हिडिओ समोर आले असून, पहिल्या व्हिडिओमध्ये मंत्री मसाज करताना दिसत होते. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन सेलमध्ये फळे आणि ड्रायफ्रूट्सशिवाय बाहेरचे अन्न खाताना दिसत होते. तिहार तुरुंगातील हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने जोरदार हल्ला चढवला. दुसरीकडे, सत्येंद्र जैन यांचा मसाज व्हिडिओ समोर आला तेव्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दावा केला होता की, सत्येंद्र जैन आजारी आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांची मालिश केली जात आहे. (हेही वाचा - दिल्लीचे आरोग्य मंत्री Satyendar Jain यांना ED कडून अटक; हवाला व्यवहारप्रकरणी झाली कारवाई)
सत्येंद्र जैन यांच्या या व्हिडीओवर भाजप खासदार परवेश वर्मा यांनी ट्विट करत लिहिले की, "मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलो आहे की, हा भ्रष्ट व्यक्ती आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत आहे. केजरीवाल यांच्यासाठी त्यांना ही सुविधा देत आहे." (हेही वाचा - Satyendar Jain: माजी मत्री सत्येंद्र जैन यांना तरुंगात मसाज, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ)
#WATCH | More CCTV visuals of jailed Delhi Minister and AAP leader Satyendar Jain in Tihar jail come out: Sources pic.twitter.com/4c6YdJ2bAL
— ANI (@ANI) November 26, 2022
यासोबतच दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सत्येंद्र जैन यांच्या मसाज व्हिडिओवर ट्विट करत लिहिले की, "आपने कायद्याची खूप पायमल्ली केली आहे! हवाला प्रकरणात बराच काळ बंद असलेले सत्येंद्र जैन कसे मस्ती करत आहेत ते पहा."