Terrorists | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भारतीय लष्कराने (Indian Army) जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवाद्यांची (Terrorists) आणखी एक घुसखोरी (Intrusion) हाणून पाडली आहे. अखनूर (Akhnoor) सेक्टरमध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने हुसकावून लावले. गेल्या 4 दिवसांत लष्कराने दहशतवाद्यांचा तिसरा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. काल रात्री नौशेरा (Naushera) सेक्टरमध्येही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, पण तोही लष्कराने हाणून पाडला. नौशेरा येथे एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले तर स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे.

नौशेराच्या झांगर (Zangar) सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांनी 21 ऑगस्टच्या सकाळी नियंत्रण रेषेवर 23-3 दहशतवाद्यांची घुसखोरी पाहिली. त्यापैकी एकाने भारतीय चौकीजवळ येऊन कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो जखमी झाला आणि त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला पकडण्यात आले. यासोबत आलेले आणखी दोन दहशतवादी जंगलाच्या आडून पळून गेले. हेही वाचा Crime: प्रेयसीला घरी भेटायला जाणे प्रियकराला पडले महागात, तरुणीच्या घरच्यांनी रॉकेल ओतून पेटवले, तरुणाची प्रकृती गंभीर

लष्करासोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेला दहशतवादी तबराक हुसेन यालाही भारतीय लष्कराने 2016 साली अटक केली होती आणि 26 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. एप्रिल 2016 मध्येही तबराक हुसेनने त्याच्या दोन साथीदारांसह नौशेरा सेक्टरमधूनच घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तबरक आणि त्याचा साथीदार हारून अली याला अटक करण्यात आली होती, मात्र त्याचा तिसरा साथीदार पीओकेमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

तबराक आणि त्याचा साथीदार हारून अली यांना 26 महिने भारतात तुरुंगात घालवल्यानंतर गेल्या वर्षी अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा तो आत्मघातकी मोहिमेसाठी भारतात घुसखोरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचला. यावेळी तोही भारतीय लष्कराच्या गोळीने जखमी झाला.