Photo Credit -X

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ते पाहता इथं प्रशासन कठोर कायदा करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यातच आता जम्मू काश्मीरचे डीजीपी आर आर स्वॅन यांच्या माहितीनुसार या भागामध्ये दहशतवादी (terrorist)किंवा तत्सम कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर मृत्यूदंडासारखी (Death penalty)कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तणाव पसरवणाऱ्या कृत्यांना दुजोरा देत ही कृत्य करण्यास हातभार लावणाऱ्या प्रत्येकाविरोधात इथं अ‍ॅनिमी एजंट्स अ‍ॅक्टअंतर्गत (Enemy Agents Act)कारवाई केली जाणार आहे.

किती कठोर आहे कायदा?

जम्मू काश्मीरचे डीजीपी स्वॅन यांच्या माहितीनुसार घुसखोरी करून काश्मीरमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या आणि दहशतवाद्यांना मदत करू पाहणाऱ्या घटकांविरोधा सक्त कारवाईची पावलं Anemy Agents Act अंतर्गत उचलली जाऊ शकतात. हा कायदा UAPA हूनही अधिक कठोर असल्याचं सांगितलं जात आहे. अ‍ॅनिमी एजंट्स अ‍ॅक्ट अंतर्गत दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला आजीवन कारावाल किंवा मृत्यूदंडाचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या कायद्याविषयी बोलताना त्यांनी कठुआ दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भातील माहितीसुद्धा दिली.

सदरील हल्ल्याचा तपास राज्यातील तपासयंत्रणेकडे सोपवण्यात आला असून, रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास आणि पुढील सर्व कारवाईची सूत्र एनआयएकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.