Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

देशात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे पालकवर्गांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यात (West Godavari) एका तरूणाने स्वत:च्या आत्याच्या मुलीवर बलात्कार (Rape) केला आहे. त्यानंतर आरोपीने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली असून आरोपीची प्रकृती स्थिर आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई नोकरीसाठी मस्कतमध्ये होती आणि तिने आपल्या मुलीला तिच्या आईबरोबर म्हणजेच तिच्या आजीकडे सोडले होती. घटनेच्या वेळी बलात्कार पीडितेची आजी कृष्णा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपींनी रात्री अकराच्या सुमारास घरात प्रवेश केला, तेव्हा घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितावर बलात्कार केला. दरम्यान, पीडिताच्या वडिलांनी आपला मुलीला रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार आरोपीच्या पालकांकडे केली. त्यावेळी पोलिसांत तक्रार केल्यास आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी पीडिताच्या वडिलांना आत्महत्येची तक्रार केली. त्यानंतर शनिवारी पीडिताच्या वडिलांना पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- West Bengal: माता न तू वैरिणी! सुया टोचून साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या; आई व तिच्या प्रियकराला सुनावली फाशीची शिक्षा

पोलिसांनी आरोपींविरुद्ध लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुलगी चौथीच्या वर्गात शिकणारी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.