![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/11/Untitled-design-13-380x214.jpg)
Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील विशाखापट्टणम येथे गुरुवारी एक भयानक घटना उघडकीस आली. विशाखापट्टणम (Vishakhapatnam) जिल्ह्यातील जुत्ताड़ा गावात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांना ठार मारले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अप्पाराजू असे आरोपीचे नाव आहे. त्याने शेजार्याच्या कुटूंबाला ठार मारण्यासाठी विळ्याचा वापर केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृत आरोपीच्या मुलीवर 2018 मध्ये मृत कुटूंबाच्या सदस्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
बलात्काराची घटना समजल्यानंतर संतप्त व्यक्तीने कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या केली. बलात्काराच्या घटनेतील कथित आरोपी अद्याप फरार आहे. अप्पाराजूने ही घटना घडवून आणली तेव्हा बलात्काराचा आरोपी आणि त्याचा मोठा मुलगा घरात नव्हता. ही घटना घडवून आणल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळापावरून पळून गेला नाही. (वाचा - धक्कादायक! भावोजींच्या प्रेमात असलेल्या मेव्हणीने आपल्याच पतीचे अपहरण करून केली निर्घृण हत्या, 8 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न)
बलात्काराचा आरोपी सध्या जामिनावर सुटला आहे. या घटनेत बलात्काराच्या आरोपींचे पिता, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, सहा महिन्यांची मुलगी आणि सासू यांचा समावेश आहे. याशिवाय घरात उपस्थित असलेल्या एका दूरच्या नातेवाईकाचीही हत्या करण्यात आली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे कुटुंब विजयवाडामध्ये राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोपी विवाहित असूनही त्याने हल्लेखोरांच्या मुलीशी जवळीक साधली होती. 2018 मध्ये, त्याने तिला तिच्या घरी बोलावले आणि तिच्यावर बेशुद्ध झाल्यानंतर बलात्कार केला. बलात्काराच्या आरोपीच्या पत्नीने मुलीचे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आणि पैशांची मागणीदेखील केली. मुलीच्या भावाने यासंदर्भात तक्रार दिली होती.