Watch Video: आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला 'हा' व्हिडिओ पाहिलात का? त्यासोबत लिहिलेला संदेश तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल
Anand Mahindra (Photo Credits: PTI)

भातातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. नुकतंच त्यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. तसेच, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना एक मोलाचा संदेश देखील त्यांच्या फॉलोवर्स दिला आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कबड्डीचा सामना सुरु असलेला दिसतो. तसेच हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, "या व्हिडिओतून मला एक मोलाचा संदेश मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. हा व्हिडिओ दाखवतो की अपयशाचे रुपांतर यशात करणे शक्य आहे. हे मी प्रो कबड्डीमध्येही पाहिलं नाही."

पाहा व्हिडिओ

आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट नेटकऱ्यांमध्ये इतका हिट ठरलं आहे की त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत ३५ हजारहुन जास्त व्ह्यूज आहेत, पाच हजारांहून अधिक लाइक्स आणि एक हजाराहून अधिक जणांनी  रिट्विट केलं आहे.

Video: शरद पवार यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची नक्कल; उपस्थितांमध्ये पिकला हशा

आनंद महिंद्रा यांनी या आधी सोशल मीडियाचा वापर करत एका घरातून पाळलेल्या मुलाला शोधलं होतं आणि त्याला आपल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप देखील दिली होती. श्रीमंत घरातील द्वारकेश ठक्कर या मुलाचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत. परंतु त्याने घरातून पळून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिमला येथील एका हॉटेलात भांडी घासण्याचं काम स्वीकारलं होतं.