Manmohan Singh retires from Rajya Sabha: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची संसदीय राजकारणातून निवृत्ती, मल्लिकार्जुन खरगे यांचे भावनिक पत्र
Photo Credit -X

Manmohan Singh retires from Rajya Sabha: मनमोहन सिंह (Manmohan Singh ) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आता ते राज्यसभा(Rajya Sabha)मध्ये दिसणार नाही. मात्र, त्यांच्या निवृत्तीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भावनिक पत्र (Mallikarjuna Kharge letter)लिहीले आहे. त्यांनी ते एक्स सोशल मीडिया अकऊंटवर शेअर केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, आज एका युगाचा अंत झाला, असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा : Kerala TTE Pushed out of Running Train: तिकीट विचारलं म्हणून प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून तिकीट एक्झामिनिरला फेकलं; तिकीट एक्झामिनिरचा मृत्यू )

त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ''समर्पण आणि निष्ठेने तुम्ही देशाची सेवा केली असे फार कमी लोक म्हणतात. देशासाठी आणि जनतेसाठी तुमच्याइतके काम फार कमी लोकांनी केले. तुमच्या मंत्रिमंडळाचा भाग होणं हे माझ्यासाठी सौभाग्याचीबाब होती. गेल्या 10 वर्षांमध्ये, मी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचा नेता असताना, तुम्ही नेहमीच माझ्यासाठी ज्ञानाचे स्रोत राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये तुमची प्रकृती स्थिर नसतानाही तुम्ही नेहमीच काँग्रेस पक्षासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा उभे राहिलात, त्यासाठी पक्ष आणि मी सदैव तुमचा ऋणी राहील'', असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा : BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ)

मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. 1991 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. तेव्हा त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. यानंतर ते 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. आता त्यांचं वय 91 वर्ष आहे.