Delhi Minor Girl Sexually Assaulted: देशभरात दररोज महिलांवरील गुन्ह्यांची नोंद होत आहे. परंतु, या गुन्ह्यांवर कठोर कारवाई होत नाही. महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना रोज समोर येत आहेत. अलीकडेच दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे एका अल्पवयीन मुलीने आपल्या शिक्षकावर लैंगिक छळाचा (Sexually Assaulted) आरोप केला आहे. एका स्वसंरक्षण प्रशिक्षकाने (Self-Defense Trainer) कथितरित्या एका सरकारी शाळेतील मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तिला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.
शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत केले घृणास्पद कृत्य -
दिल्लीतील सुलतानपुरी भागात शुक्रवारी एका 11 वर्षांच्या विद्यार्थीनीवर वर्गात एका स्वसंरक्षण प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. स्वसंरक्षणाच्या नावाखाली घृणास्पद कृत्य करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 351 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - Air Hostess Sexually Assaulted: संतापजनक! हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल)
दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. सतीश (वय, 45) असे आरोपीचे नाव असून तो एका स्वयंसेवी संस्थेमार्फत स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देतो. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने तिच्या वडिलांना सांगितले की, तिच्या क्रीडा शिक्षकाने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि नंतर तिला या प्रकारासंदर्भात कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी निषेध केला असून आरोपींवर कारवाईची मागणीही केली आहे. (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल; चौकशी सुरु)
कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे शेजारी पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुलीचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.