Amarnath Yatra: दक्षिण काश्मीर हिमालयात असलेल्या अमरनाथ गुहा मंदिरासाठी कडेकोट बंदोबस्तात 6,500 हून अधिक यात्रेकरूंचा ग्रुप मंगळवारी जम्मूहून निघाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, सोमवारी 23,000 हून अधिक यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचीवर असलेल्या मंदिरात जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 261 वाहनांमधील 6,537 यात्रेकरूंची तुकडी बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी पहाटे 3.05 वाजता रवाना झाली. ते म्हणाले की 4,431 यात्रेकरूंनी चालत जात 48 किमी लांबीच्या पहलगाम मार्गाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे आणि 2,106 यात्रेकरूंनी 14 किमी लांबीच्या बालटाल मार्गाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे ज्यात लहान पण जास्त चढाई आहे. [ हे देखील वाचा: Assam Flood: आसाममध्ये मुसळधार पावसाने केला कहर, पुरामुळे लाखो लोक बेघर, भीषण दृश्याचा व्हिडिओ समोर आला ]
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 28 जून रोजी पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला होता आणि तेव्हापासून जम्मू बेस कॅम्पवरून एकूण 26,101 यात्रेकरू काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 29 जूनपासून सुरू झालेली ही 52 दिवसीय यात्रा 19 ऑगस्टला संपणार आहे.